-
आगामी आशिया चषक स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना २९ सप्टेंबरला रंगणार आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
यावेळी ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र विराट या स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही. कारण त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान या स्पर्धेत सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट अजूनही अव्वल स्थानी आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
विराट कोहलीने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये मिळून २६ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७ वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सनाथ जयसूर्याने आणि पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिकने ५-५ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराटनंतर शिखर धवन, रोहित शर्मा सुरेश रैना आणि नवजोत सिंग यांचा नंबर लागतो. या खेळाडूंनी ३-३ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”