-
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
-
२९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सामन्यात भारताने उल्लेखनीय कामगिरी करून विजेतेपद जिंकले, परंतु पारितोषिक समारंभादरम्यान, टीम इंडियाने मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ते संतापून स्टेडियममधून गेले होते.
-
मोहसीन नक्वी यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९७८ रोजी लाहोर येथे झाला. त्यांनी लाहोर विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ओहायो विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवली.
-
मोहसीन नक्वी यांनी कारकिर्दीची सुरुवात सीएनएनपासून केली. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी सिटी न्यूज नेटवर्क सुरू करून त्यांचे मीडिया साम्राज्य स्थापन केले. त्यांचे पहिले चॅनेल, सी४२ (नंतर सिटी ४२), लवकरच पाकिस्तानच्या आघाडीच्या मीडिया ग्रुपपैकी एक बनले. मीडिया क्षेत्रातील नक्वी यांच्या योगदानामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात स्थान मिळाले.
-
मोहसीन नक्वी यांचे राजकीय संबंध पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांच्याशी आहेत. या संबंधांमुळे त्यांना जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत पंजाब प्रांताचे कार्यवाहक मुख्यमंत्रीपद मिळाले. पण, त्यांचा कार्यकाळात मोठे वाद झाले.
-
राजकारणानंतर, मोहसीन नक्वी यांनी क्रिकेट क्षेत्रात प्रवेश केला. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर लगेचच पीसीबी गव्हर्निंग बोर्डात सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये, त्यांना पीसीबीचे ३७ वे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. एका वर्षानंतर, एप्रिल २०२५ मध्ये, ते आशियाई क्रिकेट परिषदेते अध्यक्ष म्हणून निवडून आले.
-
मोहसीन नक्वी हे पाकिस्तानातील आघाडीच्या मीडिया टायकूनपैकी एक असून, ते उद्योगपतीही आहेत. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहसीन नक्वी यांची एकूण संपत्ती अंदाजे १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा अंदाजे ८८.७५ कोटी रुपये आहे. मोहसीन नक्वी यांच्या संपत्तीत त्यांची रिअल इस्टेट गुंतवणूक आणि तंत्रज्ञान स्टार्टअप्सचा महत्त्वाची भूमिका आहे. (सर्व फोटो: सोशल मीडिया)

Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट