-
व्हॉट्सअॅप मॅसेजिंग अॅपमध्ये काळानुरूप अपडेट येत आहेत. यामुळे युजर्संना फायदा होत आहे. लवकरच व्हॉट्सअॅपचे ५ नवे फिचर्स येणार आहेत. यामुळ कॉलिंग आणि चॅटिंगमध्ये नवे बदल दिसतील.
-
व्हाट्सअॅप लवकरच कम्युनिटीज तयार करण्यासाठी फिचर जारी करू शकते. व्हॉट्सअॅप कम्युनिटीजसह, अॅडमीन नवीन ग्रुप तयार करू शकतील आणि सदस्यांना ग्रुपमध्ये जोडू शकतील.
-
व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप अॅडमिनसाठी आणखी कंट्रोल्स जारी करू शकते. याच्या मदतीने ते ग्रुपमधील इतर सदस्यांचे मेसेजही डिलीट करू शकतील. यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण ठेवणे अॅडमिनला सोपे होणार आहे.
-
व्हॉट्सअॅप कॉल्स हे अॅपचे एक अतिशय प्रसिद्ध फिचर आहे. याच्या मदतीने यूजर्स इंटरनेटच्या मदतीने इतर यूजर्सना कॉल करू शकतात. WABetaInfo नुसार, कंपनी लवकरच याबाबत अपडेट जारी करू शकते. हे कॉलिंग इंटरफेस बदलेल. यामुळे अधिक आधुनिक आणि कॉम्पॅक्ट दिसेल.
-
व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉलसाठी अॅपमध्ये एक नवीन इंडिकेटर येऊ शकते. यामुळे वापरकर्त्यांना माहिती मिळत राहील. कम्युनिकेशन एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. बीटा वर्जनसाठी हे फिचर प्रथम रिलीज केले जाईल आणि नंतर इतर युजर्ससाठी रिलीज केले जाईल.
-
व्हॉटअॅप लवकरच क्विक रिप्लाय शॉर्टकट हा पर्याय व्हॉट्सअॅप बिझनेससाठी अॅड करू शकते. यामुळे युजर्स ग्राहकांना जलद रिप्लाय करू शकतील.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”