-
भारतीय रेल्वेची ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे चेन्नईमध्ये तयार केली जात आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचं प्रत्येक युनिट युरोपियन एक्स्प्रेसच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) मधील LHB शेडमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जात आहे. ही रेल्वे नेमकी कशी तयार केली जात आहे? याचे काही फोटो समोर आले आहेत.
-
चेन्नईमधील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) च्या LHB शेडमध्ये काही कामगार वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे तयार करण्यात व्यस्त आहेत.
-
पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’ला केंद्रस्थानी ठेवून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची रचना आणि निर्मिती भारतात करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
-
वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचे डबे GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने (audio-visual passenger information system) सुसज्ज असणार आहेत.
-
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ एसी डबे असतील, ज्यापैकी दोन डबे एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी असणार आहेत.
-
वंदे भारत एक्स्प्रेसची एकूण आसन क्षमता १ हजार १२८ एवढी असणार आहे.
-
चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF)मधील LHB शेडमध्ये सध्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या चालक केबिनची निर्मिती केली जात आहे. (सर्व फोटो सौजन्य- पीटीआय)

Fees Of Private Schools: “मुलांना खासगी शाळेत पाठवणं थांबवा”, मध्यमवर्गीयांना बुडवणारं गणित चार्टर्ड अकाउंटंटनं उलगडलं