-
अमेरिकन कार उत्पादक कंपनी फोर्ड मोटरचा लक्झरी कार ब्रँड लिंकन त्याच्या कारच्या उत्कृष्ट लुकसाठी जगभरात ओळखला जातो.
-
नुकतंच लिंकनने आपल्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एल१०० (L100) ही कन्सेप्ट कार सादर केली आहे.
-
ही लक्झरी फ्युचरिस्टिक कार एरो-कट डिझाईन स्टाइलिंग आणि प्रगत इंटीरियर तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे.
-
लिंकन एल१०० कन्सेप्ट कार पेबल बीच कॉन्कोर्स डी’एलिगन्स येथे प्रदर्शित केली जाईल.
-
लिंकनने शेअर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीला या कारद्वारे आपल्या पहिल्या लक्झरी कार, १९२२ मॉडेल एलला श्रद्धांजली वाहायची आहे.
-
एल१०० कारची बाह्य रचना स्पेसशिपसारखी आहे.
-
ही एक लो फ्लोर कार असल्याने ती जामिलीला लागून असल्यासारखी दिसते.
-
या कारमध्ये काचेचं छत आणि मागील बाजूस उघडणारे दरवाजे देण्यात आले आहेत. हे या कारला भविष्यकालीन रूप देतात.
-
एल१०० कन्सेप्ट कारचे आतील भाग अनेक प्रकाश सेन्सर्स आणि मोशन सेन्सर्सने सुसज्ज आहेत.
-
हे सेन्सर्स केबिनमधील हालचालींमधून एखाद्या व्यक्तीची उपस्थिती ओळखून आपोआप कार चालू करतील.
-
हे तंत्रज्ञान खूप प्रगत असेल आणि ते कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यास देखील मदत करेल.
-
अॅम्बियंट लाइट, डिजीटल फ्लोअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आणि जीपीएस सेन्सर इ. तुम्ही गाडीच्या आत बसताच कार्यान्वित होतील. यांच्या मदतीने वापरकर्त्याला सर्वोत्तम अनुभव मिळेल.
-
लिंकनची कन्सेप्ट कार एल१०० ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आणि कनेक्टिव्हिटी असलेली स्वयंचलित कार आहे.
-
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारमध्ये नेक्स-जेन बॅटरी सेल वापरण्यात येणार आहेत, जे जास्त पॉवर डेन्सिटीसाठी सक्षम असतील.
-
लिंकनचे अध्यक्ष जॉय फालोटिको म्हणतात की एल१०० कन्सेप्ट मॉडेल लिंकनच्या कथेत एक नवीन अध्याय चिन्हांकित करेल. याद्वारे, भविष्यातील ग्राहकांसाठी लिंकन कसा असेल याची कल्पना करता येईल. सर्व फोटो : lincoln.com

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक