-
मुंबईतील लालबागच्या राजा या प्रसिद्ध गणपतीच्या मुख्य दर्शनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रतिनिधींनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गणरायाचे मनोहारी रुप पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यावेळी बाप्पाची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठी झुंबड उडाली. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
यंदा लालबागच्या राजाने हिरव्या रंगाचे पितांबर परिधान केलेले आहे. याशिवाय राजाच्या मागील बाजूस साकारण्यात आलेली आरास अतिशय मनमोहक आहे. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
लालबागचा राजा नेहमीच गणेश भक्तांचे आकर्षण ठरला आहे. त्यामुळे यंदाही राजाच्या दर्शनाला लाखो भक्त बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत. यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जय्यत तयारी केली आहे. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
लालबागच्या राजाचे मनोहारी रुप डोळ्यात साठवून घेण्यासाठी दरवर्षी भक्त कित्येक तास रांगेत उभे राहतात. मात्र तरीही भक्तांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही जाणवत नाही. बाप्पाच्या दर्शनाने संपूर्ण वर्ष पुरणारी उर्जा प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
लालबागच्या दर्शनासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात. यंदाही भक्तांचा, त्यांच्या भक्तीचा सागर पाहायला मिळणार आहे. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
बाप्पाचे मनमोहक रुप उपस्थितींनी त्यांच्या डोळ्यात साठवून घेतले. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)
-
बाप्पाचे लोभसवाणे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. (छाया सौजन्य- प्रशांत नाडकर)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक