-
पालघर-मनोर मार्गावर असलेल्या वाघोबा खिंड येथे आज या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते (फोटो – नीरज राऊत)
पालघर शहराच्या वेशीवर वाघोबा देवीचे मंदिर आहे (फोटो – नीरज राऊत) आदिवासी परंपरेनुसार वाघोबा, भिलोबा, मेघोबा आदिवासी देवस्थान धर्मादाय संस्था व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोबा उत्सव साजरा करण्यात आला (फोटो – नीरज राऊत) पालघर-मनोर मार्गावर असलेल्या वाघोबा खिंड येथे आज या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते (फोटो – नीरज राऊत) या उत्सवाच्या निमित्ताने आदिवासी बांधव आपली संस्कृती, रिती-चाली,परंपरा जगासमोर आणतो. त्याद्वारे तो आपल्या समाजातील ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करतो. (फोटो – नीरज राऊत) आदिवासी बांधव निसर्गालाच देव मानत असून गावदेव, वाघोबा, भिलोबा, काळबाहरी, खंडेराव, मोर, शीतलदेवी, षडवाय आदी देवतांची सोंगे वाघोबा मंदिर परिसरात आणण्यात आली होती (फोटो – नीरज राऊत) आदिवासी पारंपरिक पद्धतीने त्यांचे पूजन करण्यात आले (फोटो – नीरज राऊत) निसर्ग पुजणार्या या समाजातर्फे प्राचीन काळापासून असलेल्या वाघोबा, भिलोबा व मेघोबा देवाची पूजा-अर्चा करून निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी साकडे घातले (फोटो – नीरज राऊत) पालघरच्या पूर्वेला वाघोबा खिंडीत वाघोबा या देवाचे मंदिर आहे. (फोटो – नीरज राऊत) प्राचीन काळापासून डोंगरात राहणार्या आदिवासी समाजाचे रक्षण करतो तो वाघोबा. म्हणून पूर्वीपासून वाघोबा खिंड चढताना सुरुवातीला वाघोबा देवाचे मंदिर आहे. (फोटो – नीरज राऊत) जंगलात राहणार्या भिल्ल देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे येथील आदिवासी मानतात. (फोटो – नीरज राऊत) म्हणून खिंडीकडे चढताना वनराईत भिलोबा देवाचे देवस्थान आहे. (फोटो – नीरज राऊत) तसेच प्राचीन काळापासून पाऊस पडावा यासाठी मेघदेव म्हणजेच मेघोबाला पुजण्याची व जागर घालायची परंपरा असल्याने येथे देवस्थानाच्या मागील बाजूस डोंगराळ भागात मेघोबा देवाचे देवस्थान आहे (फोटो – नीरज राऊत)

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…