-
दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत सुरु असलेलं आंदोलन आज मागे घेण्यात आलं. (फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)
-
पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून आझाद मैदानात हलवलं होतं. संवेदनशील जागा असल्याने पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून हटण्यास सांगितलं होतं. (फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)
-
आझाद मैदानात गेल्यानंतर काही वेळातच आंदोलकांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. (फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)
-
यावेळी आंदोलक आंदोलनस्थळ सोडत असताना पोलिसांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचं ओळखपत्र तपासलं.(फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)
-
पोलिसांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची नावंदेखील नोंद करुन घेतली आहेत. यासाठी अनेक पोलीस कर्मचारी वही घेऊन बसले होते.(फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)
-
जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे वळू लागले.(फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)
-
मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया या परिसरातून हटवलं. तसंच त्यांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आली. परंतु काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.(फोटो सौजन्य: प्रशांत नाडकर)

Randhir Jaiswal On Trump : “कोणत्याही तिसऱ्या देशाच्या…”, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानाला भारताचं सडेतोड उत्तर; जयस्वाल म्हणाले, ‘भारत-रशिया…’