-
आज भारतामध्ये ७२ वा सैन्य दिन साजरा केला जात आहे. दर वर्षी भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
-
तानिया शेरगिल या महिला अधिकाऱ्याने सैन्य दिनी संचलनाचे नेतृत्व केले.
-
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
दिल्ली कँटोनमेंट परडे मैदानावर लष्कराकडून होणारे विशेष संचलन आकर्षाचा केंद्रबिंदू असतो. सैन्याकडून यावेळी लष्करप्रमुखांना मानवंदना दिली जाते. नौदल आणि हवाई दलाचे प्रमुखही यावेळी उपस्थितीत असतात. त्यांना सुद्धा सलामी दिली जाते.
-
तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांशिवाय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावतही यावेळी उपस्थित राहतील. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी सीडीएसचा पदभार संभाळला. ते भारताचे पहिले सीडीएस आहेत.
-
अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विविध बटालियनच्या सैनिकांना लष्करप्रमुखांकडून शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. १५ सैनिकांना शौर्य पुरस्काने गौरवण्यात आले.
-
परम वीर चक्र आणि अशोक चक्र हे देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असून हे पुरस्कार मिळवणारे जवान, अधिकारी सैन्य दिनाच्या संचलनात दरवर्षी सहभागी होतात.
-
परेड ग्राऊंडवरील कार्यक्रमात बीएमपी-२ के, के ९ वज्र तोफा, टी-९० रणगाडे सुद्धा सहभागी होतील.
-
प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पट्टनायक यांनी आपल्या वाळू शिल्पातून भारतीय सैन्याला मानवंदना दिली आहे.
४ वर्षांनी कमबॅक! स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत एन्ट्री घेतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ‘ती’? प्रोमो आला समोर…