-
करोनाने थैमान घातला असताना शेअर मार्केटवरही त्याचा परिणाम पहायला मिळत आहे. (छाया सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
आठवडय़ाच्या आत सेन्सेक्सच्या रूपात दुसरी मोठी निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांना सप्ताहारंभीच ७.६२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. भारतात गंभीर स्थिती उत्पन्न होत असलेल्या करोना विषाणूबाबतची तीव्र चिंता आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात भांडवली बाजारात उमटली. (छाया सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स सोमवारी २,७१३.४१ अंशांनी आपटत ३१,३९०.०७ पर्यंत येऊन ठेपला होता. (छाया सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
तर निफ्टीत एकाच व्यवहारात ७५७.८० अंश आपटीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ९,१९७.४० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक जवळपास ८ टक्क्यांपर्यंत आपटले. (छाया सौजन्य – निर्मल हरिंद्रन)
-
करोनाची धास्ती असल्याने कार्यालयात जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षारक्षकांकडून तपासणी केली जात आहे. (छाया सौजन्य – निर्मल हरिंद्रन)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या