-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज देखील पुणे शहरातील वातावरणात बदल झाला असून आकाशात ढग दाटून आले आहेत. ( सर्व छायाचित्र : आशिष काळे )
-
त्यातच विजांचा कडकडाट होऊन जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
-
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.
-
पुणे वेधशाळेने कालच राज्यात पाच-सहा दिवस पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती.
-
पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
-
तसेच कोकण आणि मुंबईसह उपनगरांमध्ये २६-२८ तारखेपासून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती.
-
हवामान खात्याच्या शक्यतेनुसार, पुण्यात आज पावसाने हजेरी लावली.
-
दरम्यान, काल मध्यरात्रीनंतर काही तास पुण्यात चांगलाच पाऊस बरसला.
-
त्यानंतर आज सकाळी वातावरण स्वच्छ होते. सूर्यप्रकाश असल्याने उकाडाही वाढला होता.
-
मात्र, दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. ( सर्व छायाचित्र : आशिष काळे )

तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार