-
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या निर्णयामुळे खाण्यापिण्याचे हाल होत असलेल्यांना जैन मानव सेवा मंडळच्यावतीने आज अन्न पाकीटांचे वाटप करण्यात आले. ( सर्व फोटो सौजन्य : निर्मल हरिन्द्रन )
-
मुंबईतील काळबादेवी परिसरातील बेघर असलेल्यांना मंडळाच्या सदस्यांनी ही अन्नाची पाकीटं दिली.
-
अन्न पाकीटांचे वाटप करण्या अगोदर मंडळाच्या सदस्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने सर्वोतोपरी खबरदारी घेतली होती.
-
मंडळाच्या सदस्यांनी सर्वप्रथम स्वतः विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक असा पोशाख परिधान केला होता.
-
परिसरात एका ठिकाणी टेबल लावून भुकेलेल्यांना अन्न पाकीटांचे वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांनी देखील शिस्तीत रांगा लावून अन्न पाकीटं घेतली.
-
सध्या लॉक डाऊनमुळे मुंबईसह अनेक शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट