करोनाचा संसर्ग वाढताच आधी राज्य सरकारने, तर त्यानंतर केंद्र सरकारनं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. संपूर्ण जनजीवन एका दिवसांत थांबले. करोनामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारनं कठोर निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयानंतरही रस्त्यावरील गर्दी तुरळक झाली असली तरी थांबलेली नाही. महानगरं आणि शहरात दिवसभर गर्दी दिसून येत आहे. यात काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्यानं पोलिसांना लाठीचाही वापर करावा लागत आहे. (सर्व फोटो : विश्वास नांगरे-पाटील/फेसबुक) -
नाशिक शहरातील चित्रही असंच आहे. अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन फिरत असल्याचं आणि संचारबंदीचं उल्लंघन केलं जात असल्याचं नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना दिसलं.
-
नागरिकांच्या हितासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचं पालन व्हावं याकडं लक्ष देण्यासाठी मग नांगरे पाटील स्वतः रस्त्यावर उतरले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच नेते घरात थांबण्याचं आवाहन करत असताना काहीजण घराबाहेरच फिरत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी नांगरे पाटील यांनी उपाय शोधून काढला.
-
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकपासून ते सहज फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. मग नांगरे-पाटील यांनी गरज नसतानाही गाड्यांवरुन फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्याच जप्त करण्याच आदेश दिले आहेत.
-
विशेष म्हणजे जप्त करण्यात येणाऱ्या गाड्या मालकांना थेट तीन महिन्यांनी देण्यात येणार आहेत. या शिवाय नागरे-पाटील यांच्या सुचनेनुसार वेळोवेळी आवाहन करुनही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!