-
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउनची घोषणा केलेली असताना सर्व आदेश धाब्यावर बसवून धारावी परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. करोनाबाधितांच्या आकड्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे.
-
हे पाहता प्रशासनाने आता अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. वेळोवेळी बजावून देखील काही नागरिकांना समजत नसल्याने, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.
-
राज्यात सर्वाधिक करोनाबाधितांचा आकडा मुंबई शहरात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
-
अनेकांना उन्हातान्हातच रस्तायवर बसण्याची शिक्षा देखील दिली जात आहे.
-
वरळी, ग्रॅन्टरोड, भायखळा आणि आजूबाजूच्या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दक्षिण मुंबई परिसर करोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील बनला आहे.
-
कुलाब्यापासून परळपर्यंतच्या टप्प्यात सुमारे २५७ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!