ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शॉन वार्ननंतर पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शाहीद आफ्रिदीनं आपल्या ऑल टाइम एलेव्हन संघाची घोषणा केली आहे. आफ्रिदीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सोबत किंवा विरुद्ध खेळल्या खेळाडूंचा ऑल टाइम एलेव्हन संघात समावेश केला आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने अधिकृत YouTube अकाउंटवरून आफ्रिदीचे ऑल-टाइम इलेव्हनचा व्हिडिओ शेअर केला. पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीच्या ऑल-टाइम एलेव्हन संघामध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे तर तब्बल पाच पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आफ्रिदीच्या संघात सर्वाधिक पाच खेळाडू पाकिस्तानच्या संघातील आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चार तर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रत्येकी एक एक खेळाडू आहेत. इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघातील एकाही खेळाडूची आफ्रिदीने निवड केली नाही. पाहूयात आफ्रिदीचा ऑल टाईम एलेव्हन संघ सईद अन्वर अॅडम गिलक्रिस्ट रिकी पॉन्टिंग -
इंझमाम-उल-हक
जॅक कालिस राशिद लतीफ (यष्टीरक्षक) वसीम अकरम शोएब अख्तर ग्लेन मॅकग्रा शेन वॉर्न सचिन तेंडुलकर

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!