-
मुंबई : जगभरात सध्या करोनाचे संकट आले असून त्याचा परिणाम आजच्या 'गुड फ्रायडे'च्या दिनी देखील पहायला मिळाला. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
चर्च लगतच्या मुख्य रस्त्यावर एकही चिटपाखरु दिसत नाही.
-
या चर्चचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो तो ख्रिश्चन धर्मियांच्या सणांच्या दिवशी तर अधिकच फुललेला असतो. मात्र, यंदा सर्वत्र शांतता आहे.
-
देशभरातील सर्वच चर्च आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी बंद असल्याने अनेकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे धर्मगुरुंचे उपदेश ऐकले आणि प्रार्थना केल्या.
-
लॉकडाउनमुळे चर्च परिसरातील दुकानंही झाकून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत.
-
राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्व ठिकाणची चर्च बंद होती. दरम्यान, वांद्रे येथील प्रसिद्ध माउंट मेरी चर्चचा परिसर असा सुनसान होता.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती