-
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या जोडप्याच्या लग्नाला काल १२ एप्रिल रोजी दहावर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पती शोएबसोत एक फोटो पोस्ट केला आहे. (सर्व फोटो सौजन्य – सानिया मिर्झा/शोएब मलिक इन्स्टाग्राम)
-
सानिया मिर्झा भारताची प्रसिद्ध टेनिसपटू तर शोएब मलिक पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. १२ एप्रिल २०१० रोजी दोघे आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकले.
-
हैदराबादच्या ताज कृष्णा या आलिशान हॉटेलमध्ये इस्लामिक पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला.
-
शोएब मलिकने २३ एप्रिल २०१८ रोजी सानिया आई होणार असल्याचे जाहीर केले.
-
सानिया मिर्झाने ३० ऑक्टोंबर २०१८ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. 'इझहान' असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.
-
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे क्रीडा क्षेत्रातील मोठे सेलिब्रिटी कपल आहे. दोघांनी आपआपल्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी करुन दाखवली आहे.
-
शोएब मलिकने सानिया मिर्झासोबतचा दुबईमधला शेअर केलेला फोटो.
-
सानिया मिर्झा भारतीय तर शोएब मलिक पाकिस्तानी आहे. दोघांनी जेव्हा लग्नाचा निर्णय जाहीर केला, तेव्हा दोन्ही देशातून त्यांच्या निर्णयावर मोठया प्रमाणावर टीका झाली होती.
-
मी चित्रपट बनवला तर फराह खान त्यामध्ये हिरो असेल असे शोएब मलिकने कॅप्शन दिले आहे.
-
टेनिसमध्ये महिला दुहेरीच्या प्रकारात सानिया मिर्झा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. करीयरमध्ये तिने सहा ग्रँण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
-
सानिया मिर्झामुळे महिला टेनिसमध्ये भारताला एक वेगळी ओळख मिळाली.
-
१५ नोव्हेंबर १९८६ रोजी मुंबईमध्ये सानिया मिर्झाचा जन्म झाला. हैदराबादमध्ये तिने टेनिसचे धडे गिरवले
-
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने कारमध्ये काढलेला सेल्फी.
-
२००७ ते २००९ दरम्यान शोएब मलिकने पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
-
कसोटीमधून आधीच निवृत्ती जाहीर करणाऱ्या शोएब मलिकने मागच्यावर्षी वर्ल्डकप नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS