-
करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनला झुगारून मंगळवारी वांद्रे पश्चिम येथे हजारोंचा जमाव गोळा झाला. या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले आहे.
-
मुंबईत स्थलांतरित झालेल्या मजुरांची अवस्था लॉकडाउनमुळे आणखी बिकट झाली. या स्थलांतरित मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी त्यांनी वांद्रे स्टेशन परिसरात गर्दी केली होती.
ही गर्दी पांगवल्यानंतर आता त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्र : निर्मल हरिंद्रन) -
हा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला.
-
वांद्रे प्रकरणानंतर आता मदतकार्यालाही वेग आला आहे.
-
या परिसरातील गरीब मजुरांमध्ये जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे
-
याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गरजूंची रांग लागली होती.
-
स्थलांतरित मुजरांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून होऊ लागली आहे.
-
तर अफवांना बळी पडू नका, असं आवाहन लोकांना करण्यात येत आहे.
-
संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला.
-
प्रशासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना देखील घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
-
लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS