-
नवी मुंबईच्या खाडीकिनारी रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. (सर्व छायाचित्र : नरेंद्र वास्कर)
-
त्यामुळे खाडीकिनाऱ्यांवर गुलाबी छटा पसरली आहे.
-
साधारणपणे हिवाळा सुरू झाल्यानंतर दाखल होणारे रोहित (फ्लेमिंगो) पक्षी यंदा उन्हाच्या झळा लागत असतानाच दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
गुजरात, राजस्थान, कच्छ ही या पक्ष्यांची प्रजनन स्थळे आहेत. तेथील दलदलीत हे पक्षी घरटी बांधतात आणि त्यात अंडी घालतात.
-
नोव्हेंबर महिन्यापासून तेथील पाण्याची पातळी कमी होऊ लागते. पाणी आटल्यावर हे पक्षी महाराष्ट्रात ठाणे, उरण, शिवडी येथील खाडीकिनाऱ्यांवर येतात.
-
एरव्ही या पक्ष्यांना पाहण्यासाठी हौशी छायाचित्रकार, पर्यटक, अभ्यासक मोठय़ा संख्येने गर्दी करतात. मात्र यंदा लॉकडाउनमुळे हे करता येणार नाही.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS