-
नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, येथे होणाऱ्या संभाव्य गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन सज्ज असणार आहेत. (सर्व छायाचित्रे – नरेंद्र वासकर)
-
या भाजी बाजारामध्ये होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा कसा वापर करता येईल याची गुरुवारी चाचणी घेण्यात आली.
-
ड्रोनची चाचणी घेतेवेळी पोलीस आणि ऑपरेटर यांनी ड्रोनची प्रक्रिया समजावून घेतली.
-
बाजार खुला झाल्यानंतर येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
-
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ नये तसेच लोकांनी सोशल डिस्टंसिंगच पालन करावं यासाठी पोलीस कसोशीनं प्रयत्न करीत आहेत.
-
यासाठी बाजाराच्या परिसरात जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.
-
मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने काही काळ बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.
-
संग्रहीत छायाचित्र

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS