-
मध्य प्रदेशातील राघवगड परिसरातीललल खेराई गावाजवळ एक बिबट्या विहीरीत अडकला. (सर्व छायाचित्र – मध्य प्रदेश स्थानिक वनविभाग)
-
पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला विहीर किती खोलवर आहे याचा अंदाज आला नाही…मग विहीरीबाहेर पडण्यासाठी त्याची धडपड सुरु झाली
-
स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी पोहचलं.
-
यानंतर विहीरीत शिडी टाकून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला
-
सुरुवातीला या प्रयत्नात काही अडथळे आले, बिबट्याला या शिडीवर नेमकं बसावं की नाही हे समजत नव्हतं.
-
पण काहीवेळाने हळुहळू बिबट्याशिडीवर बसला आणि त्याला बाहेर काढण्यात आलं.
-
पाण्याच्या शोधात या भागात बिबट्या विहीरीत पडण्याचे असे अनेक प्रकार घडतात अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली
-
बिबट्याला शिडीच्या सहाय्याने बाहेर काढताना
-
बाहेर आल्यानंतर बिबट्याने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
-
स्थानिक वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच कालावधीनंतर या भागात बिबट्याचं दर्शन झालेलं आहे.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS