-
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिव अधिकच वाढत आहे. मुंबईत रुग्ण संख्या सर्वाधिक आहे.
-
त्यात धारावीमधील परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे दिसत आहे.
-
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व आयएमसीटीच्या समितीने धारावीच्या ट्रांझिट कॅम्पसह धारावी स्पोर्ट्स क्लबमधील क्वारंटाइन सुविधांची पाहणी केली.
-
यावेळी आरोग्यमंत्र्यांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
-
करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी पालिकेने धारावीमध्ये रहिवाशांच्या वैद्यकीय तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.
-
प्रत्येक रहिवाशाची तपासणी करून ताप, सर्दी, खोकला असलेल्यांची करोनाविषयक तपासणी करण्यात येत आहे.
-
राजेश टोपे यांनी प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून धारावीतील सद्य स्थितीची माहिती जाणून घेतली.
-
आरोग्यमंत्री टोपे यांनी करोनाच्या वाढ्त्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी वर्गास काही सूचना देखील यावेळी केल्या
-
धारावीमध्ये मंगळवारी १२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून करोनाची बाधा झालेल्या एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीमधील करोनाबाधितांची संख्या १८० वर पोहोचली असून १२ जण मृत्युमुखी पडले आहेत.
-
तसेच संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मात्र धारावीमध्ये दररोज नवे रुग्ण सापडतच आहेत

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट