-
संकट येतं तेव्हा ते चारही बाजूंनी येतं असं म्हणतात…करोनामुळे लॉकडाउनचं आयुष्य अनुभवत असलेल्या पुणेकरांच्या नशिबात आणखी एक समस्या उद्भवली आहे. ती म्हणजे पाणी टंचाई…. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येणारं उरळी देवाची व लगतच्या भागात आजही टँकरने पाणीपुरवढा होतोय. त्यामुळे लॉकडाउन काळात इतर समस्यांसोबत येखील लोकांना पाण्यासाठीही रोजची वणवण करावी लागत आहे.
-
सकाळ झाली की प्रत्येक घरातला व्यक्ती मिळेल ते भांड हातात घेऊन पाणी भरण्यासाठी सज्ज असतो. आपला पहिला नंबर पहिला लागण्यासाठी धावपळ आणि मग टँकरची वाट पाहत उभं राहणं हे जणू या नागरिकांच्या आता दिनक्रमाचा एक भाग बनलं आहे.
-
घरासमोर ठेवलेले हंडे आणि कळश्यांची रांग या भागातील पाणीटंचाई किती भीषण आहे याचं उदाहरण आहे.
-
रोजचा दिवस ढकलायचा तर पाणी हे हवंच, मग घरातले वयस्कर असो किंवा लहान मुलं प्रत्येक जण हातात कळशी घेत घरात पाणी भरण्याच्या कामात स्वतःला जुंपतात.
-
टँकर आला की आपला पाईप घेऊन वर चढायचं आणि पाणी घेण्यासाठी धडपड करायची…
-
एका टँकरमधून पाणी घेण्यासाठी शेकडो लोकं प्रयत्न करत असतात, यामधून प्रत्येकाच्या वाट्याला किती पाणी येतं हा संशोधनाचाच विषय आहे.
-
काहींना पाणी मिळतं तर काहींच्या पदरी निराशा येते…
-
महिला वर्ग रोजच्या कामासाठी पाणी भरुन घेताना…
-
आधीच करोनामुळे पुणेकर संकटात सापडले आहेत, पण पाणीच नाही म्हटल्यावर सोशल डिस्टन्सिंगचं भान तरी राहील का…आणि ते भान राखण्याची अपेक्षा आपण करायची का??

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल