-
उत्तराखंड : केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी ६.१० मिनिटांनी उघडण्यात आले. मात्र, लॉकडाउनमुळं या ठिकाणी सध्या भक्तांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
-
पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यासमवेत केवळ १६ लोकच पुजेसाठी सहभागी झाले होते. यावेळी फिजिकल डिस्टंसिंगबाबत काळजी घेण्यात आली.
-
पहाटे तीन वाजते मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. मुख्य पुजारी शिव शंकर लिंग यांनी यावेळी मुख्य पुजेसह इतर धार्मिक गोष्टीही पार पाडल्या.
-
ग्रीष्म ऋतूत दरवर्षी या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. त्यानुसार, आजपासून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याने पुढील सहा महिने केदारनाथांची पुजाअर्चा इथेच होणार आहे.
-
यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रेवेंद्र सिंह रावत यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच केदारनाथांच्या आशीर्वादाने आपण करोना महामारीच्या लढाईत यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला.
-
गेल्यावर्षी प्रमाणे यावेळी मंदिराचे दरवाजे उघडताना लष्कराचा बँड सहभागी झाला नव्हता. मात्र, तरीही मोठ्या भक्तीभावाने दरवाजे उघडण्यात आले.
-
या मंदिराचे प्रमुख पुजारी भीमाशंकर लिंग उखीमठे हे सध्या १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिव शंकर लिंग यांनी ही प्रक्रिया पार पाडली.
-
केदारनाथ धामचे दरवाजे खुले झाल्यामुळे उत्तराखंड येथील चार धामपैकी तीन धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गंगोत्री, यमुनोत्री यांचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच उघडण्यात आले आहेत. यानंतर आता १५ मे रोजी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले होतील.
आजपासून अचानक धनलाभ होणार, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार; ‘या’ तीन राशींच्या घरी लक्ष्मी वास करणार