जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर एका दिव्यांग जितेंद्रने यशाला गवसणी घातली आहे. परिस्थितीवर विजय मिळवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. पण परिस्थितीबरोबर निसर्गान दिलेल्या अपंगत्वावरही मात करून अपयश आलेल असतानाही स्वतःला आणि परिस्थितीला सांभाळत चेहऱ्यावर कुठलाही भाव न ठेवता UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या IFoS या पदासाठी निवड झालेल्या जितेंद्र पाटील यांची ही कहाणी आहे. -
खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील खरद या गावी जितेंद्र यांचा जन्म एका शेतमजूराच्या घरात झाला आणि संघर्षाला इथूनच सुरवात झाली.
-
नुकतच पाऊल टाकायला लागलेले जितेंद्र यांच्या आयुष्यातला संघर्ष येवढ्यावरच थांबनार नव्हता.
-
अचानक डोळ्यावर आलेल्या गाठीमुळे चार वर्षाचे असतानाच एक डोळा गमवावा लागला आणि त्यांचा संघर्ष दुहेरी झाला.
-
प्राथमिक शिक्षण आपल्या गावातूनच पुर्ण केल. पुढील शिक्षण पाचोरा येथे आणि पदवीचे शिक्षण कृषि महाविद्यालय पुणे येथे पुर्ण केले.
-
महाविद्यालयातून घडलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा आदर्श घेत त्यांना UPSC चे गोड स्वप्न पडले
-
पण पद्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने ICAR ची परिक्षा देऊन NDRI कर्नाल येथून मिळालेल्या स्कॉलरशीपच्या मदतीने तेही पुर्ण केले. ते करतं असतानाच UPSC चा आभ्यासही सुरूच होता
-
दुसऱ्या प्रयत्नात UPSCच्या इंटरव्यू पर्यंतचे टप्पे पार पाडले आणि यश थोड्याहून पदरात पडायच राहून गेल.
-
तरीही पहिल्या दोन प्रयत्नात आलेल्या अपयशान खच्चून न जाता अभ्यास तसाच सुरू होता.
-
पण कधीही परिस्थितीची किंवा वाचताना होणाऱ्या त्रासाची वाच्चता कधी कुठेही दिसली नाही. सर्व जग विसरून त्यांचा प्रामाणिक यज्ञ सुरूच होता.
-
ह्या तिसऱ्या प्रयत्नात मात्र नियतीला हा संघर्ष मान्य करून त्याची पावती द्यावीच लागली.
-
तरीही हा माणूस आपले पाय जमिनीवर ठेवून आहे. कुठला गाजावाजा नाही की कुठली बढाई नाही.
-
हालाखीच्या परिस्थितीशी आणि गमावलेल्या एका डोळ्याच्या दृष्टिशी दोन हात करतं येवढं उत्तुंग यश मिळवत आणि UPSC CIVIL चा इंटरव्यू देणारा हा UPSC च्या वाटेवरच्या पांतस्थांचा आदर्श आहे
-
जितेंद्रचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा!!!

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट