-
महाराष्ट्रासह मुंबईत अजुनही करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. मात्र परिस्थितीशी सामना करण्यासाठी स्थानिक सरकार आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. BKC मध्ये सध्या फार गंभीर परिस्थिती नसलेल्या करोनाग्रस्त रुग्णांसाठी क्वारंटाइन सुविधा उभी करण्याचं काम जोरात सुरु आहे. (सर्व छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
-
ही सुविधा उभी करण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे.
-
करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.
-
मुंबई महापालिकेने जवळपास ९० हजार संशयितांच्या चाचण्या केल्या आहेत.
-
मुंबईची लोकसंख्या, घनता, झोपडपट्टी विभाग यासह अनेक गोष्टी विचारात घेऊन स्थानिक महापालिका प्रशासन व राज्य सरकार काम करताना दिसत आहे.
-
धारावीसारखे लोकसंख्येची घनता जास्त असलेले विभाग लक्षात घेऊन मुंबईत ७५ हजार जणांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.
-
क्वारंटाइन सुविधा सुरु करण्यासाठी BKC मैदानावर मोठमोठे खांब व इतर सर्व साहित्य आलेलं आहे.
-
प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पार पडली जाईल याची काळती घेताना कामगार वर्ग
-
यानिमीत्ताने इथे काम करणाऱ्या मजुरांनाही रोजगार मिळाला आहे.
-
जेसीबीसीच्या सहाय्याने छताचं काम करणारा मजुर वर्ग

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल