-
देहू नगरीतून आज दुपारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाल्या.
-
या वेळी पादुकां समोर वारकऱ्यांनी टाळ मृदगांच्या गजरात फुगडी खेळली.
-
पादुकांना पंढरपुकडे मार्गस्थ करताना परंपरेनुसार त्या डोक्यावर घेण्यात आल्या होत्या.
-
फुलांनी सजवलेल्या बसमधून पादुका पंढरपुरला नेण्यात येत आहे.
-
या बसमधील पहिल्याच आसनावर पादुका ठेवण्यात आल्या आहेत.
-
बसमध्ये नियमानुसार केवळ २० मानकऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला.
-
पादुका पंढरपुरकडे मार्गस्थ होत असताना भाविकांनी गर्दी केली होती.
-
विठूनामासह तुकोबारायांचा जयघोष करत पादुकांना पंढरपूरकडे रवाना करण्यात आले.
-
पादुका नेणाऱ्या सजलेल्या बस समोर पालखी समजून अनेकांनी फोटो काढले.
-
महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
-
पुरुषांच्या बरोबरीने महिला वारकऱ्यांनी देखील उत्साह दाखवला.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील यावेळी पादुकांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

PBKS vs MI Qualifier 2 Live: मुंबई-पंजाब सामना उशिराने सुरू होणार, अहमदाबादच्या मैदानावर काय झालं?