-
जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता, प्रशासनाने ठाणे शहरासह नवी मुंबईत लॉकडाउन वाढवलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तुर्भे परिसरात आज प्रशासनातर्फे सॅनिटायजरने निर्जंतुकीकरण करण्यात आलं. (सर्व छायाचित्र – नरेंद्र वसकर)
-
तुर्भे पोलिसांनी लॉकडाउनमध्ये वाढ झाल्याचा आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घेत घराबाहेर पडू नये अशी माहिती सांगणारा सूचना फलक रस्त्यावर लावला आहे.
-
रस्त्यांवरील झाडं, बँकेची एटीएम अशा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी प्रशासन सॅनिटायजरने निर्जंतुकीकरण करत आहे.
-
तुर्भे नाका परिसरातील दाटीवाटीची वस्ती असलेल्या भागांत आणि झोपडपट्टीमध्ये पालिका प्रशासन निर्जंतुकीकरणाकडे अधिक भर देत आहे.
-
नवी मुंबईत करोना बाधित रुग्णांनी सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे.
-
पालिका कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी या कामाचा वारंवार आढावा घेत आहेत.
-
सोमवारी शहरात सात जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले.
-
करोना बाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतण्याचं प्रमाण चांगलं असलं तरीही एकूण मृतांचा आकडा २०१ वर पोहचल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता अद्याप कायम आहे.
-
लॉकडाउन काळात प्रशासन या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहे.
-
देशात आतापर्यंत ३२ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आठ लाख ६२ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २०.९६ टक्के आहे. सलग दोन दिवस बरे होणाऱ्यांची संख्या ७० हजारांहून अधिक नोंदवण्यात येत आहे.

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…