-
बारा बलुतेदारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं यासाठी, खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिराच्या समोरील बाजूस आज पुण्यात आंदोलन करण्यात आले. (सर्व छायाचित्र – सागर कासार)
-
१२ बुलतेदारांच्या सन्मासाठी भाजापा मैदानात असे यावेळी दर्शवण्यात आले. रिक्षा, टेम्पो चालकांसाठी देखील आर्थिक पॅकेजची मागणी करण्यात आली.
-
आम्हा १२ बलुतेदारांसाठी सरकार काय करणार? असा सवालही करण्यात आला. घरेलु कामगार व छोट्या व्यावसायीकांसाठी देखील आर्थिक पॅकजेची मागणी करण्यात आली.
-
राज्यातील बारा बलुतेदारांना मागील चार महिन्याच्या कालावधीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
-
यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
लॉकडाउनमध्ये सलून व्यावसायिकांनाही मोठी अडचण झाली होती.
-
हातावर पोट असणाऱ्या कारागिरांचा रोजगार बुडाला.
-
आंदोलनावेळी या बारा बलुतेदारांची प्रतिकात्मक छायाचित्र दर्शवण्यात आली.
-
या छायाचित्रांद्वारे त्यांच्या समस्यां दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल