-
नवी मुंबई : आधीच मरणासन्न झालेला सर्कस हा कलाप्रकार आता करोनाच्या संकटामुळं शेवटची घटका मोजत आहे. सर्कशीतील कालाकारांची सध्या उपासमार सुरु असून सर्कस पुन्हा नव्यानं उभारी घेईल की नाही हे ही सांगता येत नाही. (सर्व छायाचित्रे – प्रदीप दास)
-
सन २०१३ मध्ये केंद्र सरकारने सर्कशींसाठी नवी मार्गदर्शकतत्वे लागू केली. यांमध्ये प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण असलेल्या विविध प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता करोनाच्या संकटामुळं सर्कशीतील शिल्लक राहिलेला मनोरंजनाचा भाग म्हणजे कंबाईन जिम्नॅस्टिक्स, डान्स, मॅजिक ट्रक्ससह होणारं एरोबिक्स आणि विदुषक या गोष्टीही आता मरणासन्न अवस्थेत पोहोचल्या आहेत.
-
गेल्या चार महिन्यांपासून सर्कस बंद असल्याने यात काम करणाऱ्या कलाकारांचे उत्पन्न बंद झालं आहे. यामुळे सर्कसच्या मालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असून कलाकार आणि परवानगी असलेल्या प्राण्यांना कसं सांभाळायचं याची चिंता पडली आहे.
-
रॅम्बो सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितलं, आम्हाला मदत करावी असं पत्र आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. पण त्याचं आम्हाला अद्याप उत्तर आलेलं नाही.
-
सध्या सर्व कलाकारांसह ते नवी मुंबईच्या ऐरोलीतील एका मैदानात तंबू टाकून दिवस काढत आहेत. या ठिकाणी लहान मुलांसह दोन कुटुंब राहत आहेत. त्याचबरोबर १७ कुत्री, १ छोटा घोडा, सहाय्यक, प्राण्यांची निगा राखणाऱ्या व्यक्ती, स्वयंपाकी, इलेक्ट्रिशन्स, डिझायनर्स आणि तंबू बनवणारे राहत आहेत.
-
सर्कशीला वाचवण्यासाठी मी माझा फ्लॅट विकल्याचं सुजीत दिलीप यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. फ्लॅट विकून ते आता ८० जणांचं पोट भरत आहेत.
-
लॉकडाउनच्या सुरुवातीला सर्कशीतील ज्या कलाकार आणि तंत्रज्ञांची गाव जवळ होती ते गावाकडं निघून गेले. मात्र, ज्यांना सीमाओलांडून गावांना जायची भीती वाटत आहे. ते जबरदस्तीने इथं दिवस काढत आहेत.
-
आमच्या कलेबाबत, कलाकारांबाबत सध्या कोणालाही काहीही पडलेलं नाही. सरकारकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. देवचं आता आमची शेवटची आशा आहे. आम्ही सध्या आभाळाखाली राहत आहोत आणि शेवटाची वाट पाहतोय, अशी हतबल भावना ४९ वर्षीय बिजू पुष्करन नायर यांनी व्यक्त केली आहे. ते रॅम्बो सर्कसमध्ये विदुषकाचं काम करतात.
-
बेबी केसरी नामक ५० वर्षीय महिला या सर्कशीत जिमनॅस्टचे काम करतात. वयाच्या ६ वर्षापासून त्या हे काम करीत आहेत. त्या अजूनही सर्कशीत काम करुन तरुण मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना सर्कशीत काम करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. गेल्या २७ वर्षांपासून त्या या सर्कशीत काम करीत आहेत. मात्र, या लॉकडाउनच्या काळात त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पश्चिम बंगालमधील पालकांना पैसे कसे पाठवावेत याची त्यांना चिंता सतावत आहे.
-
सर्कशीत हमालाचं काम करणारे नेपाळचे राजकुमार गेल्या ९० दिवसांपासून या तंबूतील अंधारात बसून आहेत, केव्हा एकदा सीमा खुल्या होतील आणि घरी जाईन या प्रतिक्षेत. या स्वप्न नगरीकडून त्यांना आता कसलेही आशा राहिलेली नाही.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…