-
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी सामना करतो आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आसामवर खडतर काळात अस्मानी संकट कोसळलं आहे. (सर्व छायाचित्र – पीटीआय)
-
संकट आलं की चारही बाजूंनी येतं असं म्हणतात…आसाम याचा आता पुरेपूर प्रत्यय घेतोय. सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे आसाममधली परिस्थिती बिकट झाली आहे.
-
अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले असून ४४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
-
ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा इशारा देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १६ जुलैपर्यंत या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
-
गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, सोनीतपूर या जिल्ह्यांना ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर फटका बसलेला आहे. याव्यतिरीक्त धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरूप, मोरीगाव, नागाव अशा महत्वाच्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
-
NDRF ने राज्यात पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये बचावकार्य सुरु केलं आहे.
-
काझरिंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही या पुराचा फटका बसला असून आतापर्यंत ४१ प्राण्यांनी यात आपला जीव गमावला आहे. ४९ प्राण्यांना अधिकाऱ्यांनी सुरक्षीत स्थळी हलवलं आहे.
-
आसाम सरकारने १४ जिल्ह्यांमध्ये २२४ रिलीफ कँपची व्यवस्था केली आहे, यात अंदाजे २१ हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
इतक्या खडतर काळातही काही विक्रेते तग धरुन आहेत.
-
मिळेल त्या साधनाने पुरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक करत आहेत.
-
आजुूबाजूला संकट ओढावलेलं असतानाही लोकं पाळीव प्राण्यांना जमेल तशी मदत करत आहेत.
-
प्रत्येक जण आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करत आहे.
-
बहुतांश सखल भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे.
-
बांबू आणि झाडांच्या खोडाचा वापर करुन आपला बचाव करत बाहेर पडताना एक कुटुंब
-
करोनाचा सामना आणि वरु्णराजाची अवकृपा यामुळे आसाम सध्या दुहेरी पेचात सापडलं आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली