-
काँग्रेसने सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार केलं आहे. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवलं आहे. राजस्थानमधील या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसने पाच महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. जाणून घेऊयात. संग्रहित (पीटीआय)
-
मंगळवारी काँग्रेसची दुसरी विधिमंडळ पक्ष बैठक पार पडली. सोमवारी पहिली बैठक पार पडली होती. बंड पुकारणाऱ्या सचिन पायलट यांनी या बैठकीला हजर राहण्यास सांगितलं होतं. (फोटो – एएनआय)
-
पण सचिन पायलट यांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला. संग्रहित (पीटीआय)
-
काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी ठराव मंजूर केला. (फोटो – एएनआय)
-
उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचा हक्क मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे देण्यात आला.
-
मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट. (संग्रहित छायाचित्र)
-
बैठक संपल्यानंतर अशोक गेहलोत यांनी कोणतीही पत्रकार परिषद न घेता राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची माहिती दिली.
-
अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींची तसंच सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाचीही माहिती दिली
-
राज्यपालांना भेटून बाहेर आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (फोटो – एएनआय)
-
“घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होता. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजपा देशभरात घोडेबाजार करत असून त्यात सहभागी आहे,” असं अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी सचिन पायलटदेखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला. संग्रहित (पीटीआय)
-
कारवाई करण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही,” असं ट्विट त्यांनी केलं. संग्रहित (Express photo: Rohit Jain Paras)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली