-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरुवारी धारावीतील नागरिकांची नियमीत तपासणी मोहीम राबवली. (सर्व फोटो : गणेश शिर्सेकर)
-
यावेळी पाऊस सुरू असून आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
-
परिसरातील वयोवृद्ध नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.
-
संबंधित ३५ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि अन्य यंत्रणांनी करोना साथ नियंत्रणाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या योजना आखाव्यात किंवा असलेल्या योजना अद्यावत कराव्यात, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
-
करोनाच्या चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं अलगीकरण, करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या महत्त्वाच्या सूत्रांचा वापर करुन धारावीने एक मॉडेल तयार केलं.
-
स्थानिक धारावीकर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पहावे लागेल.
-
धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी धारावी मॉडेलही महत्त्वाचं आहे असं WHO चे प्रमुख टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या