-
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना समज देण्यासाठी आज पुण्यात ‘यमराज’ अवतरल्याचे दिसून आले. (सर्व फोटो – सागर कासार)
-
नागरिकांमध्ये लॉकडाउनच्या नियमांबद्दल प्रबोधन होण्याच्या दृष्टीने आज पुण्यातील स्वारगेट चौकात प्रतिकात्मक यमराज रेडा घेऊन अवतरले होते.
-
तुम्ही घरात बसा, अन्यथा माझ्या सोबत यायला तयार रहा, असा यावेळी त्यांनी इशारा दिला.
-
तसेच चौकात येणार्या दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे प्रबोधन देखील करण्यात आले.
-
विनाकारण घराबाहेर पडून आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका असे यावेळी सांगण्यात आले.
-
अनेकांना यावेळी यमराजाकडून समजही देण्यात आली.
-
नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून शहरातील चौकाचौकात व प्रत्येक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त आहे.
-
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
-
पुण्यात दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून, सध्या लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे.
-
पोलिस बंदोबस्त असूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याने, अशा नागरिकांना समज देण्यासाठी ही नवीन युक्ती करण्यात आली होती.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी