-
२००७ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. या संघात रॉबिन उथप्पाने महत्वाची भूमिका बजावली होती.
सध्या रॉबिन उथप्पा भारतीय संघाच्या शर्यतीत नसला तरीही त्याने आतापर्यंत ४६ वन-डे आणि १३ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. -
रॉबिन उथप्पाचं लव्ह मॅरेज झालं असून त्याची प्रेम कहानी एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे.. पाहूयात कसा पडला रॉबिन उथप्पा प्रेमात अन् कसं केलं प्रपोज…
-
रॉबिन उथप्पा २०१४ मध्ये विवाहबंधनात अडकला.. पण त्याआधी सात ते आठ वर्ष तो शितलला डेट करत होता…
-
शितल आणि रॉबिन उथप्पा वेगळ्या धर्माचे असल्यामुळे लग्नात अडथळा येत होता..
-
रॉबिन उथप्पानं माजी टेनिस खेळाडू शीतल गौतमसोबत २०१४ मध्ये लग्न केलं. दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे लग्न करण्यासाठी यांना आठ वर्ष लागली.
-
२००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषकानं रॉबिन उथप्पाला प्रसिद्धी मिळवून दिली…
रॉबिन उथप्पानं क्रीकेटवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यादरम्यान त्याची शीतलसोबत दोनदा भेट झाली. शीतलला पाहिल्यानंतर पहिल्या नजरेत रॉबिन प्रेमात पडला…अगदी चित्रपटातील प्रेम प्रकरणाप्रमाणे -
१९८७ मध्ये शीतलचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच तिला टेनिस खेळायला आवडत असे. तिने राज्य स्तरापर्यंत टेनीस सामने खेळले आहेत.
-
शीतल हिंदू तर रॉबिन उथप्पा ईसाई धर्माचे आहेत. दोघांनाही पहिल्या भेटीतच प्रेम झालं.
-
लग्नाआधी शीतलकधीच रॉबिन उथप्पाचा क्रिकेट सामना पाहायला गेली नाही.
-
स्थानिका सामन्यात व्यस्त असताना वेळ काढून रॉबिन उथप्पानं फिरण्याचा बेत आखला. फिरायला गेल्यानंतर रॉबिनने शीतलला प्रपोज केलं.
शीतलनेही क्षणाचा विलंब न करता होकार दिला… त्यानंतर दोघांनी आपल्या घरच्यांची परवानगी घेतली. दोन्ही पद्धतीनं दोघांनी लग्न केलं. -
शीतल आणि रॉबिनला एक मुलगा आहे. दोघेही एकमेंकासोबत खूश आहेत..

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या