-
पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं. (सर्व फोटो : पवन खेंगरे)
-
येथे ३०० खाटांची सोय करण्यात आली आहे.
-
मुलांच्या वस्तीगृहातील खोल्या यासाठी फर्ग्युसन कॉलेजकडून देण्यात आल्या.
-
क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर राहिलेले वस्तीगृह फर्ग्युसन कॉलेजकडून पुणे महानगर पालिकेला देण्यात आलं आहे.
-
पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कोविड केअर सेंटरचे सामान पोहच केलं.
-
पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे कॉलेज, शाळा आणि हॉटेल कोविड केअर सेंटरसाठी पालिका ताब्यत घेत आहे.
-
पुणे महानगरपालिका येथे करोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारत आहे. शुक्रावारपासून काम सुरू करण्यात आलं.
-
या हॉस्टेलचा एक भाग डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
-
आठवडाभरात पीएमसीकडून कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
-
सोमवारपासून फर्ग्युसन कॉलेजमधील कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.
-
पुण्यातली रुग्णसंख्या ३४ हजार ४० एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ९१७ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या २१ हजार १०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
-
दरम्यान मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली या ठिकाणी लॉकडाउनही वाढवण्यात आला आहे. आजच सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांमधलाही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, मास्क लावा. बाहेरुन घरात आल्यावर सॅनेटायझर वापरा, हातपाय धुवा करोनाला घाबरु नका पण काळजी घ्या हे आवाहन सातत्याने करण्यात येते आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी