-
अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची अंतिम तारीख ठरली आहे. संग्रहित (AFP)
-
करोना व्हायसरमुळे लांबणीवर पडलेल्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भव्य पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जाणार असल्याची माहिती राम मंदिर उभारण्याची जबाबदारी असणाऱ्या राम मंदिर ट्रस्टने दिली आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
या कार्यक्रमासाठी ५० हून अधिक व्हीआयपी हजर असणार आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
यावेळी करोनाशी संबंधित सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहेत.
-
संपूर्ण अयोध्येत सीसीटीव्ही स्क्रीन लावण्यात येणार आहेत जेणेकरुन भक्तांना कार्यक्रम लाइव्ह पाहता येईल अशी माहिती ट्रस्टने दिली आहे. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं असून अद्याप त्यांच्या कार्यालयाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. संग्रहित (PTI)
-
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर उभारणीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सर्व भाजपा नेत्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे. या यादीत भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांचा समावेश असणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
सरसंघचालक मोहन भागवतदेखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
-
अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
मंदिर उभारणीच्या जागेचं काम काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आलं होतं. भारत-चीन सीमावादाचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी या संदर्भात बैठक पार पडली. ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर ५ ऑगस्ट तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
न्यासाचे सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
राम मंदिर भव्य असणार आहेच, त्याचबरोबर तीन मजली उभारण्यात येणार आहे. सीता रसोई येथेच सीता मंदिर उभारण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
-
राम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मंदिराचं लेआउट फायनल झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होणार आहे.
-
राम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च ३०० कोटी रुपये इतका असणार आहे. तर परिसरातील २० एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च असणार आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)

शनीच्या महादशेने ‘या’ राशींचे लोक होतील कोट्यधीश! १९ वर्षे प्रभाव टिकत मिळणार अमाप संपत्ती