-
महिनाभरावर आलेला गणेशोत्सव, संपूर्ण राज्यात करोनामुळे निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती यामुळे यंदाचं वर्ष हे मूर्तीकारांसाठी खरंच खडतर आहे. (सर्व छायाचित्र : नरेंद्र वसकर)
-
पनवेलमधील मूर्तीकार प्रकाश तांबे युसूफ मेहरअली सेंटरमध्ये इको फ्रेंडली पद्धतीने गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतात.
-
पनवेल जवळील आदिवासी पाड्यांतील लोकांना काम मिळावं यासाठी प्रकाश तांबे पारंपरिक पद्धतीने मूर्ती तयार करतात.
-
पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची मूर्ती बनवल्यानंतर तिला अशा खास पद्धतीने शेकोटीजवळ ठेवलं जातं. यामुळे मूर्तीला एक ठोस आकार येतो.
-
गणपती हा विघ्नहर्ता देव म्हणून ओळखला जातो. अनेक मूर्तीकार सध्या आर्थिक संकटात आहेत. पण प्रकाश तांबे यांच्यासारखे काही कलाकार या संकटातूनही मार्ग काढत आदिवासी पाड्यातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी पारंपरिक पद्धतीने मूर्ती तयार करत आहेत.
-
यंदा करोनामुळे गणेश मूर्त्यांची मागणी कमी आहे, सण साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध आणि अटी घालून दिल्या आहेत. तरीही मूर्तीकार सर्वकाही ठीक होईल या आशेने आपलं काम करत आहेत.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक