नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परीक्षेत बीडमधील मंदार पत्की या तरुणानं उज्ज्वल यश मिळवलं आहे. मंदार पत्की याने देशातून २२ वा क्रमांक पटकावून आयएएस व्हायचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. मंदार सांगतो, "वडील सरकारी नोकरी करत असल्यामुळे सरकारी नोकरीबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला त्याबद्दल आणखी जास्त माहिती मिळाली. त्यामुळे आयएएस व्हायचं स्वप्न आणखी प्रबळ झालं." आठवीत असतानाच मंदार पत्कीने आयएएस व्हायचा घाट धरला होता. You Are cheaking the IAS officer pocket अशी चिठ्ठी त्यांनी आठवीत असताना पाकिटात ठेवली होती. पुण्यातील बीआयटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलं. शेवटच्या वर्षाला असताना UPSC ची तयारी सुरु केली. विकेंडला तो क्लासला जात असे. वर्षभरानंतर प्रयत्न केल्यानंतर मंदार UPSC परीक्षेत देशातून २२ वा आला आहे. मंदार पत्की याचं दहावीपर्यंतच शिक्षण बीडमधील संस्कार विद्यालयात पूर्ण झालं. घरात सर्वच जण उच्च शिक्षित आहे. आई गृहिणी आहे. तर वडील सध्या निवृत्त आहेत. ते एमएसईसीबीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. मंदारला दोन मोठ्या बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं एमटेक झालं असून त्या पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. तर दुसरी मोठी बहीण पुण्यात मास्टर ऑफ सर्जरी करत आहे. मंदारच्या या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण असून शुभेच्छा देण्यासाठी घरी लोकांनी गर्दी केली आहे. मंदार पत्की यांनी पहिल्या प्रयत्नात मिळवलेलं यश, अनेक तरुणांना प्रेरणा देणारं आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल