-
देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
-
देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीरही यात सहभागी झालं आहे.
-
झेंडू, शेवंती,व कामिनी या तिरंगी फुलांची सजावट केल्याने विठुमाऊलीचं रुप एकदम उजळून निघालं आहे.
-
प्रत्येक सणाच्या निमीत्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात विशेष सजावट करण्यात येते. स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने तिरंगी सजावट करण्यासाठी झेंडू, शेवंती, कामिनी यासारख्या फुलांनी विठु-रखुमाईला सजवण्यात आलं.
-
पुण्यातील सचिन अण्णा चव्हाण आणि संदीप भाऊ पोकळे पाटील यांनी या सजावटीसाठी दान दिले आहे. मंदिर समितीमधील कर्मचारी यांनी याची सजावट केली आहे.
-
पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांमध्ये देवाचं रुप अधिकच खुलून दिसत आहे.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी दर्शन बंदी आहे, असे असले तरी तीन फुलांच्या सजावटीमुळे सावळा विठुराया आणि रुक्मिणी मातेचे रूप खुलुन दिसत आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग