भारतातील कोरोना विषाणूची स्थिती लक्षात घेता यंदा आयपीएल हे संपूर्ण युएईमध्ये (UAE) होणार आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत. करोना महामारीमुळे प्रत्येक संघाला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं आहे. काही खेळाडूंनी हॉटेलचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. मुंबईचा संघही नुकताच युएईमध्ये दाखल झाला आहे. मात्र यावेळेस अनेक खेळाडू हे मास्क आणि पीपीई कीटसारखा पोषाख असल्याने ओळखूनच हेत नव्हते. खेळाडूंनी यंदा करोनामुळे अधिक काळजी घेत प्रवास केला. मुंबईचा संघ दुबईतील पंचतारांकित सेंट रेजिस सादियात आईसलँड रिसॉर्टमध्ये राहणार आहे. हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर एक आठवडा संघातील खेळाडू नियमांप्रमाणे आयसोलेट झाले आहेत. दुबईतील सर्वात महागड्या रिसॉर्टपैकी हे एक हॉटेल आहे. या रिसॉर्टमधील विलाची किंमत एक लाख रुपयांपासून सुरु होते. २.५ लाख रुपयांपर्यंत या हॉटेलमध्ये रुम आहेत. सेंट रेजिस सादियत आईसलँड रिसॉर्ट मॅरियट ग्रुपचं आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्स आणि मॅरियट ग्रुप हॉस्पिटैलिटी पार्टनर आहेत. मुंबई इंडियन्सच्या जर्सीच्या उजव्या बाजूला मॅरियट बोनवॉयचा लोगो तुम्हाला दिसेल. सेंट रेजिस सादियात या रिसॉर्टचं सौदर्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. भव्य दिव्य रिसॉर्टमध्ये राहण्याची वेगळीच मजा आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे रिसॉर्ट जगातील सर्वात महागड्या रिसॉर्टपैकी एक आहे. बेडरुम, लिव्हिंग रुममध्ये अलिशान आहेत. -
poolroom
रिसॉर्टला स्वतंत्र असा समुद्र किनारा आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही या समुद्र किनाऱ्यावर जाण्यास परवानगी नाही. मोठं गार्डन, विशाल रुम, स्पा सेंटर, भलंमोठं टेरेस आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. स्थानिक जेवनासह हवं ते खाणं या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करण्यात येत आहे. (सर्व फोटो https://www.marriott.com/ येथून घेतले आहेत)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS