-
धुळ्यात काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी आलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करुन मागे खेचलं.
-
विद्यार्थ्यांना मारहाण करताना पोलिसांना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत होता. पुण्यातही गुरुवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीविरोधात निदर्शन केली. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
गुडलक चौकात अभाविपचे कार्यकर्ते एकत्र जमले होते आणि त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.
-
दरम्यान धुळ्यातील मारहाण प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.
-
पुणे पोलिसांनीही आंदोलनस्थळी पोहचत अभाविपच्या कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…