-
पुणे : शहरात तीन मार्गांसाठी मेट्रो प्रकल्प मंजूर झाले असून त्यांची कामंही वेगानं सुरु आहेत. शिवाजीनगर भागात या तीनही मार्गांचे मुख्य जंक्शन असणार आहे. (सर्व छायाचित्रे – आशिष काळे)
-
शिवाजीनगर भागातून जाणाऱ्या जमिनीखालील मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
-
पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो मार्गासाठी शिवाजीनगर भागातून स्वारगेटच्या दिशेने सहा किमीसाठी जमिनीखालून मेट्रो रेल्वे जाणार आहे.
-
या मार्गावर खोदण्यात येणाऱ्या बोगद्याच्या मशिनचे काम आणि व्यवस्था पाहताना इंजिनिअर.
-
पीसीएमसीवरुन येणाऱ्या या मेट्रो मार्गाचे शिवाजीनगरपर्यंतचे काम हे एलेव्हेटेड अर्थात पुलावरुन असणार आहे. तर शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंतचा भाग हा अंडरग्राऊंड (जमिनीखालून) असणार आहे.
-
पुणे शहराची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेची कमतरता यासाठी मेट्रो फायद्याची ठरणार आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे
-
दरम्यान, महिन्याभरापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. या ठिकाणी पीएमआरडीए मार्फत उभारण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो लाईन जाणार असून त्यासाठी मेट्रो अधिक इतर वाहनांसाठी नवा दुमजली पूल उभारण्यात येणार आहे.
-
पुण्यात वनाज ते रामवाडी, पीसीएमसी ते स्वारगेट आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या तीन मार्गांवर मेट्रो धावणार आहे.
-
स्वारगेटला मेट्रो, पीएमपी बस, एसटी यांच्या पार्किंगसह इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी मल्टीमोड हब उभारण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.
-
पुणेकर नागरिक मेट्रोची आतुरतेने वाट पाहत आहेत हे मात्र नक्की.

“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य