-
राज्य शासनाने एसटी महामंडळाला पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर हळुहळु नागरिक प्रवासाकरता आपल्या हक्काच्या लालपरीचा पर्याय निवडताना दिसत आहेत. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकात एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये आता प्रवाशांची गर्दी पहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी ५० टक्के क्षमतेने सेवा सुरु ठेवण्याची परवानगी महामंडळाला देण्यात आली होती.
-
प्रवासादरम्यान नागरिकांना सध्याची करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.
-
प्रवासादरम्यान मास्क तसेच सॅनिटायजरने हात स्वच्छ करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे.
-
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये तिरप्या पद्धतीने म्हणजेच एका आसनावर एक प्रवासी असं आरक्षण उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाय बघून कळेल लिव्हर खराब आहे की चांगलं! ‘ही’ ६ लक्षणे असतील तर दुर्लक्ष करू नका, नाहीतर…