कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची तुफानी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४९ धावांनी पराभव केला. मुंबईच्या डावात हार्दिक पांड्याची विकेट चर्चेचा विषय ठरला. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असणारा हार्दिक पांड्या ‘हिट विकेट’ झाला. आंद्रे रसलने त्याला ऑफ साईडला टाकलेला चेंडू त्याला मारावासा वाटला पण त्याने चेंडू सोडून दिला. पण त्याच वेळी त्याची स्वत:ची बॅट स्टंपला लागल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. अशा पद्धतीने बाद झाल्यामुळे सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला ट्रोल केलं जात आहे. आत्मनिर्भर असं म्हणत हार्दिक पांड्याला ट्रोल केलं जात आहे. पाहूयात हार्दिक पांड्यावरील मिम्स… आयपीएलमध्ये ‘हिट विकेट’ होण्याची हार्दिक पांड्याची ही पहिली वेळ नाही. याआधी दोनवेळा हार्दिक हिट विकेट झाला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात हिट विकेट होणारा हार्दिक पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत हिट विकेट होणारा हार्दिक पांड्या ११ वा खेळाडू झाला आहे…. हार्दिक पांड्यावर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस पडत आहे.त्यापैकी काही मिम्स पाहूयात… -
-
-
-
-
-
-
-
-
-

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात