हो नाही हो करता करता अखेर १९ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलचा 'रन'संग्राम सुरु होऊन सहा दिवसांचा कालावधी संपला आहे. पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुलने आरसीबीविरोधात तुफान फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊयात आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत कोणी किती शतकं झळकावली आहेत…. (सर्व छायाचित्रे आयपीएलच्या संकेतस्थळावरुन घेतली आहेत. ) आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक सहा शतकांची नोंद आहे. गेलने १२५ सामन्यात सहा शतकांसह ४४८४ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील सर्वाधिक शतकांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचा दुसरा क्रमांक आहे. विराट कोहलीच्या नावावर पाच शतकांची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतकं आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतकांची नोंद आहे. मिस्टर ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिव्हिलिअर्सच्या नावावर आयपीएलमध्ये तीन शतकांची नोंद आहे. अजिंक्य रहाणेच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकांची नोंद आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर दोन शतके आहेत. आयपीएलमधील पहिलं शतकं ब्रेंडन मॅक्क्युलमने झळकावलं होतं. भारताचा स्फोटक फंलदाज विरेंद्र सेहवागच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकांची नोंद आहे. मुरली विजयनेही आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. युवा संजू सॅमसनने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. के एल राहुलच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे. आयपीएलमधील भारतीय खेळाडूंमध्ये वैयक्तिक सर्वौच्च धावसंख्या राहुलच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक सलामीवर गिलख्रिसटच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकांची नोंद आहे. आफ्रिकेच्या हाशिम आमलानेही आयपीएलमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. आमलाने १६ सामन्यात २ शतकं आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. मिस्टर आयपीएल सुरेश रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये एका शतकाची नोंद आहे. मुंबईकर रोहित शर्माने आयपीएलमध्ये एक शतक झळकावलं आहे. अंबाती रायडू – एक शतक युसूफ पठाण – एक शतक मनिष पांड्ये- एक शतक शॉन मार्श – एक शतक सचिन तेंडूलकर – एक शतक स्टिव स्मिथ – एक शतक मायकल हसी – एक शतक डेविड मिलर – एक शतक महेला जयवर्धेने – एक शतक ऋषभ पंत – एक शतक -
वृद्धीमान साहा
क्विंटन डिकॉक – एक शतक लेंडल सिमन्स – एक शतक केविन पिटरसन – एक शतक सायमंड – एक शतक सनथ जयसुर्या – एक शतक बेन स्टोक्स – एक शतक जॉनी बेअरस्टो – एक शतक पॉल वल्थाटी – एक शतक

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक