-
पुणे तिथे काय उणे…ही म्हण आतापर्यंत आपण अनेकदा ऐकली आहे. पुणे शहरातील ३७ वर्षीय रिक्षाचालक प्रभू बेनशेट्टे ही म्हण तंतोतंत खरी करत आहेत.
-
करोनामुळे शहरात निर्माण झालेली परिस्थिती आणि घर चालवण्याची जबाबदारी यावर तोडगा काढताना बेनशेट्टे यांनी पीपीई कीट घालून रिक्षा चालवायचं ठरवलं. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रस्त्यावर पीपीई कीट घालून रिक्षा चालवताना बेनशेट्टे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
-
लॉकडाउन काळात बेनशेट्टे यांसारख्या अनेक रिक्षाचालकांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनलॉकच्या काळात या रिक्षाचालकांना घर चालवण्यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं झालंय.
-
पीपीई कीटमुळे बेनशेट्टे सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांनी घेतलेली काळजी पाहता प्रवासी त्यांच्या रिक्षात निर्धास्त बसतात.
-
अनेक करोना रुग्णांनाही बेनशेट्टे यांनी सेवा दिली आहे.
-
आपल्या प्रवाशांना विषाणूची लागण होणार नाही याची काळजीही बेनशेट्टे घेताना दिसत आहेत.

अखेर तो क्षण येणार! ३० वर्षांनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात येणार भरभरुन सुख? शनी-सूर्याचा ‘नवपंचम राजयोग’ बनवणार करोडपती!