Bhojpuri Actress Monalisa Age Wiki Bio Networth Income: भोजपुरी सिनेमांमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. मोनालिसाने भोजपुरीशिवाय हिंदी, उडिया, बंगाली आणि दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटात काम केलं आहे. सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास आहे. २१ नोव्हेंबर १९८२ रोजी कोलकातामध्ये बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला. मोनालिसाने उडिया म्यूजिक व्हिडीओतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २००८ मध्ये भोले शंकर या भोजपरी चित्रपटातून मोनालिसानं सिने जगात एण्ट्री केली. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त भोजपूरी चित्रपटात मोनालिसानं भूमिका केल्या आहेत. Topplanetinfo.com नुसार एका चित्रपटासाठी मोनालिसा पात ते सात लाख रुपयांची फी घेते. Topplanetinfo.com नुसार २०२० पर्यंत मोनालिसाची एकूण संपत्ती २.५ मिलियन डॉलर म्हणजेच १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१६ मध्ये बिग बॉसच्या १० व्या सिझनमध्ये मोनालिसा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मोनालिसाने नजर या मालिकेत मोहाना हे नकारात्मक पात्र साकारलं आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ब्लॅकमेल चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी तिने अनेक छोटया बजेटच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय