-
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह विरोधकांचा समाचार घेतला. राज्यातील व देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कुणाविषयी काय बोलले, त्यातील काही ठळक मुद्दे… (फोटो सौजन्य/ आदित्य ठाकरे ट्विटर/ शिवसेना)
-
"अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाही. जर वाटेला जालं, तर मुंगळा कसा डसतो तेही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होतं त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील."
-
संग्रहित छायाचित्र
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'हिंदू व हिंदुत्वाबाबत काही लोक संभ्रम पसरवत आहेत. हिंदुत्वाला संकुचित के ले जात आहे,' अशा मोहन भागवत यांच्या विविध विधानांचा दाखला ठाकरे यांनी दिला. मंदिर, पुजाअर्चा हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे, याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी भाजप आणि कोश्यारी यांना लक्ष्य केले. राजकारण म्हणजे शत्रूशी युद्ध नव्हे, विवेक पाळा हा भागवत यांचा संदेशही समजून घ्या. बाबरी मशीद पडली तेव्हा जे बिळात शेपूट घालून बसले होते ते आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत. तुमचे हिंदुत्व थाळ्या-घंटा बडवणारे असेल. पण शिवसेनेचे हिंदुत्व दहशतवाद्यांना बडवणारे आहे, असेही ठाकरे म्हणाले.
-
“देश रसातळाला चालला आहे. देश ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही. आपल्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही अशी इंग्रजांनाही मस्ती होती. पण इंग्रजांचे साम्राज्य मावळले, सूर्य तळपतच आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आपलेच सरकार अशी महत्त्वाकांक्षा भाजपची होती. ती संधी भाजपने आपल्या वृत्तीमुळे गमावली. शिवसेनेसह महाराष्ट्रात, विष्णोई यांच्यासह हरयाणात व आता नितीशकुमार यांच्यासह बिहारमध्ये हाच पाठीत वार करण्याचा डाव खेळत आहेत. “जीएसटीची करपद्धत फसली आहे. ते पंतप्रधान मोदींनी मान्य करावं. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पुढे या आपण यावर चर्चा करु,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
"बिहारमध्ये करोनाची मोफत लस देणार असे भाजपचे आश्वासन आहे. बाकीचा देश काय मग बांगलादेश आहे? लाज वाटली पाहिजे देशाची अशारितीने फाळणी के ल्याबद्दल. महाराष्ट्राने अनेक उद्योगांशी करार के ले व लवकरच आणखी काही करणार आहे. महाराष्ट्र पुढे चालला म्हणूनच बदनाम करण्याचा हा डाव आहे. आदित्यवर, पोलिसांवर, शिवसेनेवर चिखलफे क के ली व खोटे आरोप के ले. १० तोंडाचा रावण महाराष्ट्रावर चालून आला."
-
“एक तोंड म्हणते मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. खरे तर हा पंतप्रधान मोदी यांचा अपमान आहे. कारण देशाचा एक भाग पाकव्याप्त काश्मीर होत असेल तर ते पंतप्रधानांचे अपयश आहे. भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते, त्यांना म्हणावं, अनधिकृत सोडून द्या. ३७० कलम काढलेलं आहे. अधिकृत १ इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं. वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, ही असली रावणी औलाद.,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
-
“महाराष्ट्र पुढे जातो, म्हणून अनेकांचा पोट दुखतं आहे. चरस गांजा उघड विकला जातो, असे चित्र उभं केलं जातं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराबाहेर तुळशी वृंदावन आहे. तुमच्याकडे गांजाची वृंदावने आहेत का?”
-
"जीएसटीचे हक्काचे पैसे केंद्राकडे मागितले तर रावसाहेब दानवे म्हणाले, लग्न तुम्ही केले आणि पैसे बापाकडे मागता. दानवे (केंद्रात) बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे (कार्यकर्ते, जनता)आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची गरज नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ."
-
"शिवसेनेसह महाराष्ट्रात, विष्णोई यांच्यासह हरयाणात व आता नितीशकुमार यांच्यासह बिहारमध्ये हाच पाठीत वार करण्याचा डाव खेळत आहेत. दहीहंडी फोडताना पाया मजबूत हवा नाही तर पाया ढासळतो आणि वरचा माणूस दोरीला लटकतो. आधी शिवसेना, मग अकाली व आता इतर काही जण रालोआ व भाजपमधून बाहेर पडत आहेत. पाया ढासळत आहे."

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख