-
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे गेले ४ दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले. आज दिल्लीत येणारे पाचही मार्ग बंद करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र त्यासाठी हे शेतकरी दिल्लीच्या सिमांवर ठिय्या मांडून बसले आहे. एकीकडे उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढत असल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याचे बसल्याचे दिसत आहे.
-
थंडीच्या दिवसांमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरच झोपावे लागत आहे.
-
अनेक शेतकरी हे अंगावर चादरी आणि ब्लँकेट घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत.
-
अनेक आंदोलक शेतकऱ्यांनी जागोजागी शेकोट्या करुन त्याभोवती बसून गप्पा मारत रात्र जागवल्याचेही चित्र काही ठिकाणी पाहायला मिळालं.
-
शेतकरी बुराडी मैदानावर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावही त्यांनी नाकारला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या तीसहून अधिक शेतकरी गटांची बैठक रविवारी झाली. बुराडी मैदान हा ‘खुला तुरुंग’ असल्यामुळे आपण तेथे जाणार नाही, असे आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर सांगितले. शेतकरी कुठल्याही अटींवर चर्चेला तयार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आज शेतकरी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व जोर लावणार असून हा संघर्ष चिघळताना दिसत आहे. (सर्व फोटो साभार एएनआय)

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार, केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा